भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 223 वर

नवी दिल्ली ः भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 223 वर पोहचली आहे. यामध्ये 32 कोरोनाबाधित रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. तर, 20 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातामध्ये 32 परदेशी नागरिक कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 नागरिक इटलीचे, 3 नागरिक फिलपीनचे, 2 नागरिक ब्रिटनचे आहेत. कॅनडा, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशाचे प्रत्येकी एक-एक नागरिक कोरोनाबाधित आहेत. तर भारतामध्ये कोरोनामुळे कर्नाटक, पंजाब दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक-एक रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात 10 हजार 030 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2 लाख 44 हजार 523 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर जगभरात 4 हजार 440 कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसंत, चीनमध्ये या कोरोना विषाणूने सर्वात जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. चीन 81 हजार 199 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर इटलीमध्ये याविषाणूने 3 हजार 405 नागरिकांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 52 रुग्ण आढळले आहेत. देशभरामध्ये 20 कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.  चीनच्या वुहान प्रांतामधून झपाट्याने पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरातील 150 पेक्षा जास्त देशामध्ये शिरकाव केला आहे. या विषाणूमुळे जगभरात 10 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,50,000 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतातील अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, मॉल, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आदेश दिले आहेत.


Popular posts
मुंबई ः राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा सूचना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना करोनाची लागण झाल्याने घरात विलगीकरण करून ठेवलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार असल्याचे सांगितले. तो रूग्ण कळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या तसेच सॅनिटाझर ठेवा, गर्दी कमी करा अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला असून मंत्रालयात कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी केलं. राज्यभरातील जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणार्‍यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणार्‍या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली.
कारंजा येथे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री
कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम